हिंगोली: नोकरी, कामधंद्यानिमित्त विखुरलेले लोक व शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले विद्यार्थी दिवाळी सणासाठी आपल्या गावी परततात. या दिवसांत खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करतात..त्यामुळे अनेक जण गावी जाण्यासाठी महामंडळाच्या एसटीचा प्रवास पसंत करतात. यंदा दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत आणि या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी एसटी प्रशासनाने १८ जादा विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे..Hingoli News: हिंगोलीत धक्कादायक प्रकार! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग मुख्याध्यापकासह दोन शिक्षक निलंबित, अधीक्षकाला अटक.जिल्हाअंतर्गत दोन आगारांतून गावखेड्यात बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत जादा बस सोडण्यात येणार आहेत. १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, २२ ऑक्टोबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीज आहे. विशेष बसच्या आरक्षणाची सुविधा एसटीने प्रवाशांसाठी प्रत्येक आगार व बसस्थानकावर उपलब्ध करून दिली आहे..हिंगोलीतून सर्वाधिक बस:हिंगोली आगारातून १६, तर कळमनुरी आगारातून दोन जादा बस सोडण्यात येणार आहेत.तसेच पुणे, मुंबई, नाशिक या मार्गांवरही अधिक बस धावणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक पुणे येथे राहतात. त्यांना ये-जा करण्यासाठी दिवाळीत हिंगोली आगाराने विशेष बस सोडल्या आहेत..या मार्गांवर धावणार बस:हिंगोली येथून सर्वाधिक बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी तीन, लातूरसाठी एक, बीडसाठी दोन, नाशिकसाठी एक, पुणेसाठी चार, अमरावतीसाठी तीन, वर्धासाठी एक, तर कळमनुरी येथून छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसाठी प्रत्येकी एक अशा दोन गाड्या सोडण्यात आल्या आहेत..Diwali 2025: दिवाळीत 'या' वस्तू गिफ्ट करू नका, नात्यात येईल दूरावा .हंगामी भाडेवाढ रद्दमुळे दिलासा: दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळाने केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यांना ही वाढ लागू होणार होती. मात्र, आता ही हंगामी दरवाढ रद्द झाल्यामुळे या काळात प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.