
Beed Crime News: परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांचा २१ महिन्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला. एवढ्या दिवसांत पोलिसांनी साधे आरेपीही निष्पन्न केलेले नाहीत. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात विषारी रसायन प्राशन केल्यानंतर एसपींनी एसआयटी स्थापन केली. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पोलिस यंत्रणा आणखी कामाला लागली आहे. मुंडे कुटुंबियांची भेट नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांना भेटीची वेळ दिली.