
बीड : पावणेपाच लाख ठेवीदारांची ३ हजार ७१५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांच्या ‘एमपीआयडी’अंतर्गत जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावासाठी विशेष न्यायालयाच्या परवानगीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदारांनी शोधलेल्या २३८ मालमत्ता ‘एमपीआयडी’अंतर्गत जप्तीच्या प्रक्रियेसही सुरवात झाली.