केवायसी मेसेजला रिप्लाय करताय...जरा थांबा!!! आधी हे वाचा...

प्रकाश बनकर
Sunday, 15 December 2019

या एसएमएस लिंकद्वारे जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी विचारण्यात येतो. यासह फोनवरून तुम्हाला ओटीपीही विचारला जातो. ती माहिती ग्राहकाने सांगितल्यांनतर त्याची फसवणूक होते.

औरंगाबाद : "तुमच्या बॅंक खात्याशी केवायसी अद्ययावत करायचा आहे.' या संबंधित कुठलाही मेसेज किंवा फोन आल्यास त्यास प्रतिसाद देऊ नका. कारण अशी कोणतीही माहिती बॅंक ग्राहकाला विचारत नाही. माहिती दिल्यास फसवणूक होईल. यामुळे सावधानता बाळगा, असे आवाहन महाराष्ट्र बॅंकेने ग्राहकांना केले असल्याचे "एआयबीईए'चे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूकर यांनी सांगितले. 

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारावर भर दिला आहे. हा व्यवहार जेवढा फायद्याचा आहे तेवढाच (जोखमीचा) धोक्‍याचाही आहे. या ऑनलाइन प्रणालीचा स्वीकार आज सर्वजण करीत आहेत. पॅनकार्ड, अधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक हे बॅंक खात्याशी जोडणे सक्‍तीचे (केवायसी) आहे. बॅंकेत; तसेच सरकारमान्य "आपले सरकार या सेंटर'वर ग्राहकांना आपले केवायसी अद्ययावत करता येते. "केवायसी'वरून नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्राहकांना फोन अथवा मोबाईलवर संदेश पाठवून केवायसी अपडेट करण्याचे सांगतात. याची लिंक या "एसएमएस'द्वारे पाठवून त्या लिंकवर ग्राहकाने क्‍लिक केल्यानंतर ग्राहकांची फसवणूक होते, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा-जिथून गेले पानिपतावर मराठ्यांचे सैन्य, तो किल्लाच सरकार दरबारी उपेक्षित : पहा...

विचारली जाते ही माहिती 
या एसएमएस लिंकद्वारे जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी विचारण्यात येतो. यासह फोनवरून तुम्हाला ओटीपीही विचारला जातो. ती माहिती ग्राहकाने सांगितल्यांनतर त्याची फसवणूक होते. त्यामुळे अशी कोणतीही माहिती देऊ नये. बॅंक अशी माहिती कधीही विचारत नाही. 

हे वाचलंत का?- आष्टीच्या 'झेडपी' शाळेचे मास्तरही गायब, पोरंसुद्धा 

"गुगल पे'च्या नावाने खोटी लिंक व्हायरल 
ऑनलाइन मोबाईल बॅंकिंग आणि व्यवहारासाठी "भीम ऍप', "फोन पे', "गुगल पे' असे अनेक विविध ऍप आहेत. याच ऍपच्या नावाने खोट्या लिंक व्हॉटस्‌ऍप फिरवून तुमची माहिती जमा केली जात आहे. यातून तुमच्या बॅंक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईलचीही माहिती घेतली जात आहे. अशा प्रकारे काही दिवसांपासून "गुगल पे'च्या नावाने एक खोटी लिंक शेअर होत आहे. लिंकवर क्‍लिक करा आणि मिळवा पाचशे ते पाच हजार रुपये असे या मेसेजमध्ये लिहिलेले असते. यामुळे सोशल मीडियावर तसेच एसएमएस आणि फोनच्या माध्यमातून आपणास आपली माहिती विचारत असेल तर ती देऊ नका. कोणत्याही अनोखळी आणि संशयास्पद लिंकवर क्‍लिक करू नका. अन्यथा, आपलीही फसवणूक होईल.​

हे वाचाच- भाजप-शिवसेनेची महापालिकेतील युती तुटली-आमदार अतुल सावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not respond to any messages regarding "KYC"