अशी करा परीक्षेची तयारी

File photo
File photo

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच सीबीएससी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये होत आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, अभ्यासक्रमही अंतिम टप्प्यात आलेला आहे. डिसेंबरपासून शाळा तसेच क्‍लासेसमधून सराव परीक्षेसह रिव्हजनला सुरुवात होणार आहे. एेनवेळी गोंधळ होवू नये यासाठी आत्तापासून तयारी करण्याची गरज आहे.  

आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. दोन्ही परीक्षा पुढच्या करीअरसाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांना मोठी चिंता लागून असते. परिणामी, सारखे विद्यार्थ्यांवर गुणांचे ओझे टाकले जाते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातो.  नेमके परीक्षेच्या काळातच विद्यार्थ्याला नैराश्‍य येत असल्याने स्वप्न साकार होत नाही. परंतु, परीक्षेपूर्वीच जर वेळापत्रकानुसार अभ्यास केला तर, सहजतेने परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळू शकतात असे समुपदेशक डॉ. जयवंत काकडे यांनी ‘सकाळश’ बोलताना सांगितले.

अशी करा परीक्षेची तयारी


- प्रत्येक विषयाचा नेमून दिलेला अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न व परीक्षेचा कालावधी यांची अचूक माहिती करून घ्या.
- परीक्षेच्या संरचनेच्या आधारे अभ्यासाचे नियोजन केल्यास तो अधिक परिणामकारक होईल.
- प्रश्‍नपत्रिकेत पर्याय दिले असल्यास विद्यार्थी अभ्यासक्रमातील काही भाग आपल्या अभ्यासातून वगळतात. अर्थात ऑप्शनला टाकतात. जरी पर्याय उपलब्ध असले तरी कोणताही भाग पूर्णपणे वगळू नका. थोडक्‍यात उत्तर लिहिता येईल इतपत तयारी वगळलेल्या भागाचीही करा.
- मागील वर्षाच्या प्रश्‍नपत्रिका समोर ठूेवून त्यांचे नीट वाचन करा. प्रत्येक युनिटवर आधारित कोणते प्रश्‍न विचारले गेले आहेत त्यांची यादी करा. संपूर्ण पुस्तक किंवा नोट्‌सचा अभ्यास करण्यापेक्षा अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे तयार करण्यावर भर द्यावा.
- विषयाशी संबंधित सर्व पुस्तके व नोटस एकत्र करा. प्रश्‍नांप्रमाणे त्यंचे वर्गीकरण करा. प्रत्येक युनिटमधील मुख्य संकल्पना (थीम) टिपून घ्या व त्याखाली उप-संकल्पना (सब-थिम्स) लिहून काढा. अभ्यास करताना एका वेळेसएक संकल्पना पूर्ण करूनच पुढच्या संकल्पनांकडे वळा.
- नोट्‌सचे प्रमाण व वेळेची कमतरता पाहून मनावर दडपण येऊ शकते. एका वेळेस संपूर्ण विषयाचा विचार न करता एका युनिटवर लक्ष केंद्रित करा. त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आणखी एक युनिट अशा सोप्या, सहजसाध्य भागांमध्ये अभ्यास करा. यामुळे तणावमुक्त राहून बराच अभ्यास पूर्ण करता येईल.
- नोट्‌स वाचताना महत्त्वाचे शब्द, मुदे अधोरेखित करा. त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण वाचून, उदाहरणे समजून घ्या. मग नोट्‌स बंद करूनसर्व प्रमुख मुद्दे आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. लक्षात न राहिलेल्या मुद्यांची उजळणी करा किंवा ते दोन-तीन वेळा लिहून काढा.
- थोडा वेळखाऊ असला तरी लिहून केलेला अभ्यास सर्वात उत्तम
- व्याख्या, सुत्रे, नियम यांसारखे महत्त्वाचे मुद्दे मात्र शब्दशः आत्मसात करा. ते मोठ्या अक्षरांत लिहून सतत नजरेस पडतील अशा ठिकाणी लावा. महत्त्वाच्या मुद्यांची रोज उजळणी करा.

वेळेवर अभ्यासाला गती देणे धोक्याचे

‘‘दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर महिन्यापासून बहुतांश महाविद्यालय व शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेण्यास सुरुवात होईल. त्यानंतर परीक्षेची तयारी करावी लागते ती विद्यार्थ्यांनाच. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. अनेक विद्यार्थी हे परीक्षेची तारीख समोर आली की मगकच अभ्यासाला गती देतात, हे चुकीचे आहे. वेगवेगळे विषय, ढीगभर नोट्‌स...मग प्रश्‍न पडतो की अभ्यासाला सुरुवात कुठून करावी व कशी? हे टाळण्यासाठी वरील टीप्स आत्मसात कराव्यात.’’
- डॉ. जयवंत सरोदे (समुपदेशक)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com