

Early Life and Education of Dr. Bhagwant Pawar
Sakal
येरमाळा : यूपीएससी द्वारे वैद्यकीय अधिकारी पदाकरिता घेतली जाणारी लेखी परीक्षा २० जुलै २०२५ रोजी पार पडली होती.परीक्षा पास झाल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी यूपीएससी सेंटर दिल्ली येथे मुलाखत यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सी.एम.एस.परीक्षेचा निकाल २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये डॉ.भगवंत गणेश पवार यांनी ऑल इंडिया मधून २५ वी रँक प्राप्त करून यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले. वैद्यकीय अधिकारी क्लास वन पदाकरता त्याची निवड झालेली आहे.