

Shri Tondeshwar Mahadev Temple at Dongargaon (Shiv) in Phulambri taluka has been granted 'B' Class pilgrimage status by the Maharashtra government following sustained efforts by MLA Anuradha Chavan.
Sakal
फुलंब्री : तालुक्यातील डोंगरगाव (शिव) येथील प्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तोंडेश्वर महादेव मंदिराला राज्य शासनाने तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा मंजूर केला आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी शासन स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे मंदिराच्या विकासासाठी नवे दालन खुले झाले आहे.