esakal | घाबरु नका... रेमडेसिव्हिरचा मोठा साठा परभणीला मिळणार; पालकमंत्री नवाब मलिक

बोलून बातमी शोधा

नवाब मलीक
घाबरु नका... रेमडेसिव्हिरचा मोठा साठा परभणीला मिळणार; पालकमंत्री नवाब मलिक
sakal_logo
By
सकाळ वृत्तेसेवा

परभणी ः जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गामुळे मृत्य पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील रुग्णांसाठी तातडीने रेमडेसिव्हिर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. जिल्ह्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शनाच मोठा साठा तात्काळ उपलब्ध होईल असी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत दिली.

परभणी जिल्ह्यातील कोरोना विषाणु संसर्गाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाबमलिक हे बुधवारी (ता. 21) रात्री जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.22) अगदी सकाळी आठ वाजल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह कोविड सेंटरला देखील भेटी देवून परिस्थितीची पाहणी केली. दुपारी पत्रकाराशी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जिल्हा शासकीय रुग्णालयातंर्गत आयटीआयसह जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत 700 खाटा तसेच खासगी कोवीड सेंटर मधून 700 खाटा असे एकूण एक हजार 400 खाटा उपलब्ध आहेत.परंतू कोरोना संसर्गाच्या रुग्णांत होणारी वाढ लक्षात घेता, परभणीत 500 खाटांचे व प्रत्येक तालुकास्थानी 50 क्षमतेचे असे एकूण 400 खाटांचे कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक हजार खाटांची क्षमता वाढणार आहे असेही पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले.

हेही वाचा - उच्च न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या कोरोनाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे.

जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उपलब्धतेवर बोलतांना श्री. मलिक म्हणाले, परभणी जिल्हयात कोरोना रुग्णांचा मृत्युदर जास्त आहे. त्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा साठा जिल्हा प्रशासनाकडे गुरुवारी (ता. २२) पोहचेल. निश्चितच या इंजेक्शनची देखील मुबलक उपलब्धता होईल, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये असे आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदीची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे