esakal | धीर सोडू नका, खचून जाऊ नका या शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव (ता.तुळजापूर) येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची बुधवारी (ता.२१) पाहणी केली.

धीर सोडू नका, खचून जाऊ नका या शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव (ता.तुळजापूर) येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची बुधवारी (ता.२१) पाहणी केली. यावेळी त्यानी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना तातडीची मदत म्हणुन धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले.

पिकाने डोलणारी शेती झाली उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले

काटगाव येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना योग्य मोबदला देणार असल्याचे सांगितले. दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हा निश्चितपणानं मदत जाहीर करण्याचे आश्वासन त्यानी दिले. मंदिर बंद असुन ते सुध्दा संकट दुर होऊ दे अस साकड तुळजाभवानी मातेकड करत असल्याचे त्यानी सांगितले. श्री.ठाकरे म्हणाले, की मला महाराष्ट्र नवीन नाही. आजची परिस्थिती भयावह आहे, आपण संकट पाहिली नाही असे नाही. मला कल्पना आहे, की तुम्ही मला भेटायला आला आहात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नुकसानग्रस्त लोकांना म्हणाले. ते पुढे म्हणाले, की मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे.

मी आकडे लावण्यासाठी आलेलो नाही. धीर सोडू नका, खचून जाऊ नका, असा दिलासा मुख्यमंत्री ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री शंकरराव गडाख, मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top