
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे काही ही विधाने करतात. त्यामुळे त्यांच्या विधानांना महत्त्व देण्याची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केली.
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे काही ही विधाने करतात. त्यामुळे त्यांच्या विधानांना महत्त्व देण्याची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केली. पदवीधर निवडणुकीच्या प्रसारासाठी श्री.पवार हे रविवारी (ता.२९) जालना येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार पवार म्हणाला की, कोरोनाच्या काळात कधी बाहेर न पडणारे आता पदवीधर निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत आणि त्यांना दोन महिन्यांत भाजपची सत्ता येणार असे वाटते.
परंतु रावसाहेब दानवे यांच्या त्या बोलण्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. तसेच पवार कुटुंबातील कोणता सदस्य मुख्यमंत्री होणार संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानालाही अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे आमदार पवार यांना म्हटले. तसेच राज्य पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकाजुटीने काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुतंशी उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
तसेच महाविकास आघाडी सरकराने नवीन उद्योग आणण्यासाठी मागील नऊ ते दहा महिन्यांत ५० ते ५२ कोटी रूपयांचे करार केले आहेत. जनतेने भाजप आणि महाविकास आघाडीचे सरकारच्या कामातील फरक पाहिला आहे. भाजपने कोरोनाच्या काळातही विरोधाला विरोध केला, असे आमदार पवार म्हणाले.
संपादन - गणेश पिटेकर