shivraj surnar and vishwanath surnar
sakal
अहमदपूर - तालुक्यातील रूध्दा गावात पिता पुत्रांचा खून झाल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रूध्दा शिवारातील स्वतःच्या शेतातील आखाड्यावर झोपलेले शिवराज निवृती सुरनर (७० वर्ष) व विश्वनाथ शिवराज सुरनर (19 वर्ष) यांच्यावर तीन नोव्हेंबर रात्र ते चार नोव्हेंबर पहाट दरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून निर्घृण खून केला आहे.