चाकूर: अॅग्रीस्टेकची नोंदणी होण्यासाठी पाच दिवसापासून अडचणी येत असल्यामुळे पिक विमा भरण्यापासून अनेक शेतकरी वंचीत राहत असताना गुरूवारी (ता.३१) विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी विमा कंपनीचे पोर्टलही बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट ओढावले असून विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.