Beed Newssakal
मराठवाडा
Beed News: मानसिक छळ, दागिने मोडणे, पैशाची मागणी या सगळ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आयुष्यच संपवलं,अंबाजोगाईतील घटना
Beed Crime: अनम शेख या बीडमधील २० वर्षीय विवाहितेने सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्यच संपवलं. लग्नानंतरच्या अवघ्या वर्षभरातच तिच्यावर संशय व पैशासाठीचा दबाव वाढला होता.
अंबाजोगाई : सासरच्या त्रासाला कंटाळून शहरातील एका विवाहितेने शनिवारी (ता.२७) गळफास घेत आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनम शेख (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.