

Dr Abhay Bang speech on Indian education crisis
sakal
लातूर : विद्यापीठांमध्ये तीन–चार वर्षे शिक्षण घेतल्यानंतर उत्तीर्ण केले जाते आणि प्रमाणपत्र दिले जाते. पण, या प्रमाणपत्राचा विद्यापीठाबाहेर काहीही उपयोग होत नाही. नोकरीसाठी मुलांना पुन्हा वेगळी परीक्षा द्यावी लागते. असेच होणार असेल तर विद्यापीठाचे प्रमाणपत्र बोगस म्हणायचे का? मग पालकांनी विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हा दाखल करायचे का? असा सवाल ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गुरुवारी (ता. १२) येथे उपस्थित केला.