महामानवाला नांदेडमध्ये अभिवादन

Nanded News
Nanded News

नांदेड :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. सहा) रेल्वेस्थानकासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली होती. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासह खालील बाजूस ठेवण्यात आलेल्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर आणि जिल्ह्यातही अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड  यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. महापालिकेच्या वतीने महापौर दीक्षा धबाले यांच्यासह आयुक्त लहुराज माळी, शिक्षण, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रकाशकौर खालसा, उद्यान अधीक्षक डॉ. फरहतउल्ला बेग, क्षेत्रीय अधिकारी गौतम कवडे, नगरसेवक बापूराव गजभारे, विलास धबाले, प्रकाश येवले आदींनी अभिवादन केले.  

भारतीय जनता पक्षातर्फे महानगराध्यक्ष प्रविण साले, विजय गंभीरे, अरुंधती पुरंदरे, डॉ. शीतल वैद्य-भालके, शततारका पांढरे, दिलीपसिंग सोडी, दीपक पावडे, डॉ. बालाजी गिरगावकर, व्यंकटेश साठे, मनोज जाधव, सुनिल पाटील आदींनी अभिवादन केले.  

कॉँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेल्या अभिवादनप्रसंगी माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, नगरसेवक दयानंद वाघमारे, साहेबराव धनगे, निलेश पावडे, डॉ. श्याम तेलंग, आनंदा गुंडिले, भीमराव गायकवाड, प्रा. ललिता बोकारे, सुषमा थोरात आदी उपस्थित होते. 

वंचित बहुजन आघाडी, बहुजन संघर्ष सेना व इतर पक्ष तसेच संस्था, संघटनांच्या वतीनेही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. दरम्यान, या निमित्ताने विविध संस्था, संघटना आणि पक्षाच्या वतीनेही अभिवादनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन संघर्ष सेना आणि प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कूलतर्फे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमेश सोनाळे, प्रफुल्ल सावंत, सुखदेव चिखलीकर, प्रितम जोंधळे, अमोल राऊत, भारत मगरे, राजेश चौंदते आदी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com