A packet of pills—which had expired a year prior (10/2025)—dispensed to a patient from the pharmacy at Gurumauli Hospital in the city, along with the bill issued by the pharmacy.
sakal
बीड - खाजगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराने आणि नफखोरीच्या हव्यासामुळे आता बळीराजासह सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी अक्षरशः खेळखंडोबा चालल्याचे उघडकीस आले आहे. बीड शहरातील एका नामांकित रुग्णालयातील अनावस्था चव्हाट्यावर आली असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुमाऊली हॉस्पिटल मधील औषध विक्रेत्याकडून चक्क वर्षभरापूर्वी (१०/२०२५ मध्ये) एक्स्पायर झालेल्या गोळ्या एका गंभीर रुग्णाला उपचारादरम्यान दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका बाजूला जीवनदान देण्याचे काम करणाऱ्या रुग्णालयातूनच थेट मृत्यूचे विष दिले जात असल्याने संतप्त नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.