Latur: वैद्यकीय अहवाल राखून ठेवला; डॉ. मेहुल राठोड आत्महत्या प्रकरण, कारणाचा शोध सुरूच
Doctor's Postmortem Report Kept Reserved: लातूरमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड आत्महत्या प्रकरणात वैद्यकीय अहवाल राखीव ठेवण्यात आला आहे. केमिकल ॲनालिसिसनंतरच अंतिम अहवाल पोलिसांना दिला जाणार असून आत्महत्येमागील कारणाचा शोध अद्याप सुरू आहे
लातूर: येथील ‘एम.जे. हॉस्पिटल’चे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४३) यांनी बुधवारी (ता. १५) आत्महत्या केली होती. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. १६) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.