- अनिल गाभुडविहामांडवा - शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिवच्या डॉ. शुभम रामनारायण धूत यांना राष्ट्रपती भवनातील 'स्वागत समारंभा'साठी मानाचे आमंत्रण..भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या ‘स्वागत समारंभा’साठी (At Home Reception) राष्ट्रपती सचिवालयातर्फे धाराशिव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, संशोधक व समाजसेवक डॉ. शुभम रामनारायण धूत यांना अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे.या भव्य समारंभात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विविध देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होतात..डॉ. धूत हे स्वराज्य वैद्यकीय संघ (SVS) या संपूर्ण महाराष्ट्रातील युवक आयुर्वेद डॉक्टरांच्या स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. केवळ १९ व्या वर्षी ही संघटना स्थापन करून त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. SVS च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आयुर्वेद जागृती, जनारोग्य शिबिरे, आयुर्वेद औषध निर्मिती कार्यशाळा, तसेच दुर्गम भागातील आरोग्य सेवा असे असंख्य उपक्रम राबवले गेले असून या कार्याची दखल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देखील घेतली आहे..याशिवाय, डॉ. धूत हे "रक्तामृत इन हिमोफिलिया संशोधन आणि विकास विभाग" चे संस्थापक आणि मुख्य संशोधक देखील आहेत. हे एक जागतिक दर्जाचे संशोधन प्रकल्प असून हीमोफिलिया या दुर्मिळ रक्तविकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून शाश्वत व सर्वसमावेशक उपाय देण्याचा त्यांचा प्रयत्न मागील 7 वर्षापासून चालू आहे.आजवर जगात या आजारावर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, श्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि आयुर्वेदाच्या सखोल अभ्यासातून त्यांनी ‘रक्तामृत वटी’ हे जगातील पहिले आयुर्वेदिक औषध तयार केले आहे, जे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे..याच दृष्टीकोनातून त्यांनी जगातील पहिले आयुर्वेदिक हीमोफिलिया डे केअर सेंटर, शासकीय आयुर्वेद रुग्णालय धाराशिव येथे सुरू केले असून, पारंपरिक आयुर्वेद व आधुनिक चिकित्सा यांचा संगम घडवणारे हे केंद्र हीमोफिलिया रुग्णांसाठी एक मोठे वरदान ठरत आहे.या सर्व कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत राष्ट्रपती सचिवालयाने डॉ. शुभम रामनारायण धूत यांना निमंत्रण देणे ही त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी व आयुर्वेद क्षेत्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे..प्रतिक्रिया -'माझ्या आयुष्यातील हे क्षण अत्यंत गौरवाचे व भावनिक आहेत. राष्ट्रपती भवनासारख्या सर्वोच्च ठिकाणी स्वतः राष्ट्रपती महोदयांकडून स्वतंत्रता दिनाच्या स्वागत समारंभासाठी आमंत्रण मिळणे ही केवळ माझी वैयक्तिक सन्मानाची बाब नाही, तर हे संपूर्ण आयुर्वेद क्षेत्र, माझ्या संघटनेतील प्रत्येक सेवाभावी डॉक्टर, तसेच हीमोफिलिया ग्रस्त रुग्णांसाठी लढणाऱ्या आमच्या संशोधन कार्याची दखल आहे.हीमोफिलियासारख्या दुर्मिळ रक्तविकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'रक्तामृत वटी' हे औषध आणि त्यावर आधारित संशोधन हा माझ्या जीवनाचा ध्यास बनला आहे. तसेच, मी स्थापन केलेल्या 'स्वराज्य वैद्यकीय संघ'च्या कार्यातून जनतेसाठी निस्वार्थ सेवा करणे हेच आमचे ध्येय राहिले आहे..हा सन्मान मला आणखी जबाबदारीची जाणीव करून देतो. सद्गुरूंच्या कृपेने आणि समाजाच्या आशीर्वादाने मी हे कार्य पुढेही तितक्याच समर्पणाने चालू ठेवीन.'- डॉ. शुभम रामनारायण धूत, संस्थापक अध्यक्ष – स्वराज्य वैद्यकीय संघ (SVS), संस्थापक व मुख्य संशोधक – Raktamrut Hemophilia Research Initiative.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.