दुष्काळग्रस्त गावांत हवामान अनुकूल कृषिप्रकल्प

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

लातूर - मराठवाडा व विदर्भातील चार हजार दुष्काळग्रस्त असलेल्या गावांत चार हजार कोटी रुपये खर्च करून हवामान अनुकूल कृषिप्रकल्प राबविण्यात येणार आहे. या गावातील शेती दुष्काळापासून सुरक्षित करण्यासाठी या प्रकल्पात उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

लातूर - मराठवाडा व विदर्भातील चार हजार दुष्काळग्रस्त असलेल्या गावांत चार हजार कोटी रुपये खर्च करून हवामान अनुकूल कृषिप्रकल्प राबविण्यात येणार आहे. या गावातील शेती दुष्काळापासून सुरक्षित करण्यासाठी या प्रकल्पात उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

मराठवाडा व विदर्भातील दुष्काळामुळे बाधित झालेल्या चार हजार गावांत तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील सुमारे 900 गावांत सहा वर्षे कालावधीत जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने चार हजार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत चार गावांतील शेती दुष्काळापासून सुरक्षित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रकल्प क्षेत्रातील दुष्काळामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या या चार हजार गावांची निवड करण्याकरिता सरकारच्या वतीने कृषी विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

प्रकल्पातील चार हजार गावांपैकी तीन हजार गावे ही मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील आहेत. एक हजार गावे ही विदर्भातील सहा जिल्ह्यांतील राहणार आहेत. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील अमरावती, अकोला, बुलडाणा यांतील 894 गावांचा समावेश आहे. ही गावे निवडताना हवामान, कृषी, सामाजिक स्थितीबाबत पाहिले जाणार आहे. या गावांची निवड करताना पाणलोट क्षेत्राशी सुसंगत असणाऱ्या गावांचा समूह गट तयार करून या गावांचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेशही सरकारने दिला आहे

खडसेंच्या मुक्ताईनगरवर विशेष लक्ष
विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील अमरावती, अकोला, व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील 894 गावे यापूर्वीच उच्चस्तरीय समितीने निश्‍चित केलेली आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील खारपाण पट्ट्याच्या समस्यांनी बाधित गावांची निवड करण्याचे आदेश देऊन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघाकडे सरकारने विशेष लक्ष दिले आहे.

Web Title: Drough affected area have good atmosphere for agri project