Drought : सळई उद्योगालाही दुष्काळाचा फटका ; दर कमी होऊनही मागणी घटली,उद्योजकांचे मत

येथील स्टील उद्योगाचा डंका संपूर्ण देशासह परदेशातही आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतारांचा येथील स्टील उद्योगावरही परिणाम होतो. मात्र, यंदा येथील या उद्योगावर दुष्काळाचा परिणाम झाल्याचे चित्र आहे.
Drought
Drought sakal

जालना : येथील स्टील उद्योगाचा डंका संपूर्ण देशासह परदेशातही आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतारांचा येथील स्टील उद्योगावरही परिणाम होतो. मात्र, यंदा येथील या उद्योगावर दुष्काळाचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दुष्काळी स्थितीमुळे बांधकामांच्या संख्येत घट झाल्याने सळईची मागणी घटली आहे. विशेष म्हणजे सळईचे दर कमी झाल्यानंतरही मागणी नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येते.

गत हंगामात जिल्ह्यासह राज्यात अल्प पाऊस झाला. त्यामुळे राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली असून, जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशात बांधकामांसाठी पाणी कसे उपलब्ध होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परिणामी, सळईची मागणी काहीशी घटली आहे. काही महिन्यांपासून सर्व करांसह सळईचे दर ४९ हजार रुपये टन आहेत, असे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. तुलनेत सळईचे दर कमी होऊनही मागणी नसल्याचे उद्योजक सांगतात.

कच्च्या मालाच्या दरातही घट

कच्च्या मालाचेही दर कोसळले आहेत. सध्या ३३ हजार रुपये टनापर्यंत कच्चा माल या उद्योगाला मिळत आहे. मात्र, सळईला अधिक मागणी नसल्याने ती तयार करून ठेवण्याची वेळ आली आहे.

सळई उद्योगावर दुष्काळाचा परिमाण जाणवत आहे. आता प्रत्येक कंपनीकडे मोठ्या प्रमाणात सळई तयार आहे. मात्र, दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू नसल्याने सळईची मागणी घटली आहे. त्यामुळे सध्या सळईचे दर हे सर्व करानंतर ४९ हजार रुपये टनापर्यंत खाली आले आहेत.

— घनश्‍याम गोयल, संचालक, कालिका स्टील, जालना

सईळ उत्पादन पूर्ण क्षमतेने होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर कमी असतानाही सळईला मागणी कमी आहे. या उद्योगावरही दुष्काळी स्थितीचा परिणाम व्हायला सुरवात झाली आहे.

— दिनेश राठी, आयकॉन स्टील, जालना.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com