
परंडा : तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक मद्य प्राशन करून आल्याचा प्रकार शनिवारी (ता. २९) घडला. याप्रकरणी ‘खडू’ घेऊन नव्हे तर ‘दारू’ पिऊन शाळेत आलेल्या मद्यपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी चिंचपूर (बु.) येथील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.