‘लम्पी स्किन’ मुळे जनावरांच्या तपासणीवर भर, परभणी जिल्ह्यात धोका...

file photo
file photo

पूर्णा (जिल्हा परभणी)  ः तालुक्यातील ९६ गावांपैकी ४५ गावांमध्ये गाय व म्हैसवर्गीय ५२३ पशुंना ‘लम्पी स्किन’ आजार झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता वेळीच काळजी घेऊन उपाय करणे गरजेचे असल्याचे आवाहन पूर्णा पशुवैद्यकीय अधिकारी श्रीनिवास कारले यांनी केले.
 
तालुक्यासह ग्रामीण भागात पशुंना जास्तीत जास्त लम्पी स्किन आजाराची बाधा वाढत आहे. परंतू, बाधा झालेल्या पशुंची सुधारणा होत आहे. पूर्णा पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत १९ गावे येतात. त्यात गायवर्गीय दहा हजार १९७ व म्हैसवर्गीय तीन हजार ९५५ असे एकुन १४ हजार १५२ पशु आहेत. आदींपैकी उपलब्ध लस चार हजार १०० जनावरांना देण्यात येणार आहेत इतर लस उपलब्ध झाल्यास सर्व जनावरांना देण्यात येइल अशी माहीती पशुवैद्यकीय अधिकारी श्रीनिवास कारले व राजु खंडागळे यांनी दिली.

हेही वाचाहिंगोली : घरकुलांसाठी एक कोटी सहा लाखाचा निधी प्राप्त- खासदार हेमंत पाटील 

लंपीवरील औषधी उपलब्ध करा ः अर्चना देशमुख यांचे पत्र

झरी ः मराठवाड्यात जनावरांवर लंपी आजाराने धुमाकुळ घातला आहे. त्यावरील उपाचारासाठी हजारो रुपयांचा खर्च होत असून शासकीय पशुदवाखान्यात औषधी नसल्याने बाहेरुन औषधी आणाव्या लागत असल्याने शासनाने तत्काळ लंपी आजारावरील औषधी उपलब्ध करुन देण्याची मागणी झरी येथील जिल्हा परिषद सदस्या अर्चना गजाननराव देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.एका जनावराच्या उपचारासाठी किमान दोन ते तीन हजार खर्च येत आहे. एका शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार जनावरे आहेत. त्यामुळे १२ हजारांचा खर्च होत आहे. शासकीय दवाखान्यात औषधी संपल्याचे सांगितले जात असल्याने खासगी दुकानातून औषधी घेणे शक्य नसल्याने शासनाने शासकीय दवाखान्यात औषधीसाठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अर्चना देशमुख यांनी केली आहे. याबाबत पशु विकास अधिकारी डॉ.अजय धमगुंडे यांनी सांगितले, दररोज ११० ते १२० पशुधन दवाखान येतो. एक महिन्याचा औषधाचा स्टॉक दोन-तीन दिवसात संपला. पर्यायाने आता शेतकऱ्याला औषध विकत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक करा Good News ; प्लाझ्मा थेरपीची आज परभणीत शक्यता...


पिंपरी (गिते) येथे शंभर जनावरांना लसीकरण

चारठाणा ः जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक क्रमांक असून पशु वैद्यकीय दवाखान्याला १३ गावे जोडलेली आहेत. लंपिंग रोगाच्या पार्श्वभूमीवर डॉ.प्रकाश सावने व नानासाहेब राऊत यांनी जिल्हा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठपुरवठा केल्याने चारठाणा येथील पशु वैद्यकीय दवाखाण्यात लस उपलब्ध झाली असून पशु वैद्यकीय दवाखाण्यांतर्गत १३ गावात लसीकरण मोहीम राबविल्या जाणार असल्याची माहिती डॉ. सावने यांनी दिली. लसीकरणाचे उद्‍घाटन समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. प्रकाश सावने, खाडे, रमेश गिते, शिवहर गिते, गजानन गिते, नवनाथ गिते, आसाराम गिते, अजय गिते, दिनेश गिते, विशाल गिते आदींची उपस्थिती होती. लम्पी रोगाने जनावरे त्रस्त असून पशु पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रकाश सावंने यांनी ‘सकाळ' शी बोलताना सांगितले. पिंपरी गिते येथे शंभर जनावरांना लसीकरण करण्यात आले. हलविरा ९० तर दगडचोप ८० जनावरांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती सावने यांनी सांगितले. परिसरातील सर्व पशुपालकांनी लम्पी स्कीन रोगाची लक्ष टोचून घेणाचे आवाहन केले.  

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com