esakal | दुर्देव : कोरोनाच्या लढाईत नर्स-आशा वर्करची फरफट
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत जोखीमीचे काम आहे. या कामात आरोग्य अधिकारी यांच्यापेक्षा आशा वर्कर्स आणि नर्सेस यांचे काम सर्वात आधी असते. असे असताना, त्यांना अपुरी साधनसामुग्री देवून दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे दुर्वेवच म्हणावे लागेल.

दुर्देव : कोरोनाच्या लढाईत नर्स-आशा वर्करची फरफट

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दीत पीरबुऱ्हाण येथे बुधवारी (ता.२२ एप्रिल २०२०) जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने महापालिकच्या यंत्रणेची झोप उडाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पहिल्याच दिवशी सकाळी तातडीने आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेऊन २५० पथकाची स्थापना केली.  शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन नागरीकांच्या आरोग्य तपाणीचे काम या पथकामार्फत हाती घेण्यात आले आहे.
 
नियुक्त केलेल्या पथकामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने नर्सेस, आशा वर्कर्स, ब्रदर्स यांची निवड केली आहे.  पहिल्या दिवशी या टिमच्या बळावर महापालिकेने शहरातील दहा हजार नागरीकांच्या टेंम्परेचर (ताप) तपासणी केली. असे असले तरी, पुरेशा प्रमाणात सुरक्षेची साधने उपलब्ध नसताना देखील जोखमीच्या कामात सर्वात पुढे असलेल्या नर्स, ब्रदर्स आणि आशावर्कर्स यांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेशी साधनसामुग्री दिलेली नाही. विशेष म्हणजे जंगमवाडीच्या कार्यालयातुन त्यांना ठरवून दिलेल्या परिसरामध्ये जाण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुठल्याही प्रकारची वाहन सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.  दिलेल्या भागात ड्युटीवर जाण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुठलिही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. 
  
हेही वाचा- Video-लॉकडाऊन : घरात बसून तरुणाई म्हणतेय ‘मुस्कुराएगा इंडिया’
येजा करण्यासाठी सुविधांचा अभाव-

महापालिकेची हद्द दहा ते बारा किलोमिटर पर्यंत पसरलेली आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी आरोग्य तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांना वाहन सुविधा नसल्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघण्याची वेळ त्यांच्यावर येवून ठेपली आहे. ज्यांच्याकडे दुचाकी आहे त्याच दुचाकीवर दोन-दोन कर्मचारी दिलेल्या ठिकाणी जात आहेत. ज्यांच्याकडे गाडीच नाही त्यांचे मात्र प्रचंड हाल सुरु आहेत. प्रामुख्याने त्यात नर्स आणि आशा वर्कर्स यांची अधिकच हाल होत आहे. 

कामाचा तान वाढला

नांदेड जिल्ह्याच्या सिमेला लागुन असलेल्या लातूर, हिंगोली, परभणी इतकेच नव्हे तर, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात कोरोनाने पाय पसरले आहे. नांदेड शहरात मात्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यापलीकडे काहीच नियोजन केलेले नव्हते. त्यामुळे बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ऐनवेळी आरोग्य विभागावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी यांना पासेस देणे, बैठका घेऊन नियोजन करणे अशा कामातच जास्तीचा वेळ खर्ची केला जात आहे. परिणामी आरोग्य आधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची बघायला मिळत असून कोणीच कोणाचे कॉल घेत नाही, योग्य माहितीही दिली जात नाही.  

हेही वाचा- पीरबुऱ्हाणचा पाच किलोमीटर परिसर सील

रुग्णवाहिकेची कमी

सध्या महालिकेकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका या आरोग्य साहित्याची ने आन करण्यासाठी लावण्यात आल्या आहेत. तर काही रुग्णवाहिका या खराब झालेल्या आहेत. आरोग्य कर्मचारी यांच्या तीन सिफ्टमध्ये ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. त्यांच्या ड्युटीची वेळ संपली तरी, त्यांना रात्री बे रात्री घरी जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने तीन-तीन तास वाट बघावी लागत असल्याचे एका आरोग्य सेवीकेने ‘सकाळ’शी बोलताना धक्कादायक माहिती दिली.
 

loading image