esakal | पीरबुऱ्हाणचा पाच किलोमीटर परिसर सील
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

ता.२२ मार्चला मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यास बुधवारी (ता.२२) पूर्ण एक महिनापूर्ण होत आहे. ‘लॉकडाउनचा महिनापूर्ण होत आलाय, आता नांदेडात कोरोनाचा शिरकाव होणार नाही. या संभ्रमावस्थेत नांदेडकर विनाकारण  कोरोनामुक्त नांदेड जिल्हा म्हणून उगीचच रस्त्यावर मिरवत होते. मात्र अचानक कोरोनाचा रुग्ण आढळुन आल्याने शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि चौकात बुधवारी स्मशान शांतता दिसून आली.

पीरबुऱ्हाणचा पाच किलोमीटर परिसर सील

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्याच्या आजुबाजुस असलेल्या लातूर, परभणी, हिंगोली, इतकेच काय तेलंगणा आणि आध्र प्रदेशामध्ये कोरोना संक्रमीत रुग्ण  आढळुन येत होते. मात्र नांदेड जिल्हा अद्यापही सेप झोन मध्ये होता. परंतु मंगळवारी एकुण नऊ जाणांच्या लाळेचे स्वॅब तपासणीचे आहवाल बुधवारी (ता.२२) रोजी सकाळी प्राप्त झाले आणि नांदेडात पहिल्या‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याचे रिपोर्ट वरुन स्पस्ट'झाल्याने जिल्हा प्रशासन नांदेडकरांच्या भुवया उंचावल्या. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता.२२) सकाळी तातडीने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या उपायोजनांची खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी जनतेने घाबरुन न जाता घरीच राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन केले व पीरबुऱ्हान परिसरास लागुन असलेल्या पाच किलो मीटर पर्यंतचा परिसर पूर्णतः सील केला आहे. 

हेही वाचा- धक्कादायक : नांदेडमध्ये कोरोना बाधीत पहिला रुग्ण

सोमवारी शासकीय रुग्णालयात झाला होता दाखल

पीरबुऱ्हाण गल्लीतील हा रुग्ण सोमवार (ता.२०) एप्रिल २०२० रोजी दुपारी ताप, खोकला व दम लागत असल्याच्या कारणामुळे विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. या रुग्णाच्या घशातील लाळेचा स्वॅब (नमुना) घेऊन तो औरंगाबाद येथील प्रयोग शाळेच तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रयोग शाळेतुन अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभागाची धावाधाव सुरु झाली. 

आरोग्य विभागाची उडाली धांदल

हा रुग्ण महापालिका हद्दीत सापडल्याने महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाची चांगलीत तारंबळ उडाली. महापालिकेची आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. महापालिकेचे उपायुक्त इजितपाल सिंह संधु व आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश सिंह बिसेन यांनी सर्व आरोय कर्मचारी यांची बैठक घेऊन खबरदारीच्या सुचना दिल्या. 

हेही वाचा- धक्कादायक ब्रेकिंग : मालेगावच्या बंदोबस्ताहून परतलेल्या हिंगोलीच्या सहा जवानांना कोरोना

हा भाग सील

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा परीषद कॉलनी, एरीगेशन कालनी, बालाजीनगर, भाग्यनगर कॉलनी, शोभानगर, टिळकनगर, आनंदनगर, एलआयसी कार्यालय परीसर, गीतानगर, पावर हाऊस, असरानगर, सुमय्यानंगर या पिरबुऱ्हाण परीसरास लागुन असलेल्या भागात पाच किलो मीटर पर्यंत सील करण्यात आले आहे. भागातील जनतेने घरातच राहावे, घराबाहेर पडुनये असे स्पस्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहेत.