esakal | ई-पीक पाहणी ॲपला सर्व्हर डाऊनचे शुक्लकाष्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb

अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून पीक पहाणी ऍप गटांगळ्या खात असल्याने बहुतांश शेतकरी वैतागून ऑनलाइन पिकाची नोंदणी करण्याचा नादच सोडून देण्याच्या तयारीत आहेत

ई-पीक पाहणी ॲपला सर्व्हर डाऊनचे शुक्लकाष्ट!

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): ई-पीक पहाणी ॲप हे तंत्रज्ञान दोन दिवसांपासून कोमात गेलं आहे. पीक पहाणी ऍप ओपन होत नसल्याने अनेक तांत्रिक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ऍपद्वारे सातबारा उताऱ्यावर पीक पेऱ्याची ऑनलाइन नोंद घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून पीक पहाणी ऍप गटांगळ्या खात असल्याने बहुतांश शेतकरी वैतागून ऑनलाइन पिकाची नोंदणी करण्याचा नादच सोडून देण्याच्या तयारीत आहेत.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकाच्या नोंदणीसाठी "माझी शेती, माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पीकपेरा" उपक्रमांतर्गत ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती केली. १५ ऑगस्टपासून ई पीक पाहणी हे ऍप लाँच केले. ऍप तयार करतेवेळी राज्यात किती शेतकरी आहेत, किती खातेदार आहेत, किती फोटो अपलोड या ऍपमध्ये होतील त्याप्रमाणे ऍपची क्षमता बनविणे, या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन निर्मिती करणे आवश्यक होते. मात्र महसूल विभागाने तसा विचार न केल्याने इ पीक पाहणी ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून लक्षात येत आहे.

हेही वाचा: NEET Exam: नांदेडमध्ये रविवारी ३५ केंद्रावर होणार परीक्षा

शेतकरी वैतागले-

इ पीक पाहणी ऍपद्वारे सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंदणी आवश्यक आहे. शासनाने तलाठी यांना शेतकऱ्यांच्या अर्जानूसार पीक पेऱ्याची नोंद घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे इ पीक पाहणी ऍपद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी कुठे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यास तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहायक आदी महसूल विभागातील अधिकारी मदत करतात. मात्र दोन दिवसांपासून पीक पहाणी ऍप सुरळीत चालत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. सर्व्हर हळू चालणे, नेटवर्क अचानक गायब होणे आदी कटकटी वाढल्याने ऍपद्वारे नोंदणी होत नसल्याचे मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.

loading image
go to top