
केदारखेडा : मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच पाझर तलाव भरले आहेत. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील मत्स्य व्यावसायिकाने तलावात बीज टाकणे सुरू केले आहे. मागील दोन वर्षांपासून पुरेसे पाणी नसल्याने या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.