मराठवाडा भूकंपाने हादरला; नांदेड, परभणीसह हिंगोलीला भूकंपाचे धक्के

Marathwada Earthquake News मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या तीव्र धक्क्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
Nashik earthquake

Earthquake

esakal

Updated on

गणेश भोयर, महागाव : मराठवाड्यात परभणी, नांदेडसह हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का बसला. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे परिणाम महागाव तालुक्यातही जाणवले. तालुक्यातील वाकोडी येथे सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सौम्य धक्का जाणवला, तर डोंगरगाव येथे ८ वाजून ४७ मिनिटांनी कंपनाची नोंद झाली. याशिवाय तालुक्यातील काही इतर भागातही हलके धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. Earthquake Tremors in Marathwada

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com