Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळाने यंदा वैद्यकीय सेवा देताना वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंच्या माध्यमातून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे.
Eco-friendly Ganesha idols in dharur city

Eco-friendly Ganesha idols in dharur city

sakal

Updated on

किल्लेधारूर - धारूर शहरातील जय किसान गणेश मंडळाने यंदा वैद्यकीय सेवा देताना वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंच्या माध्यमातून आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे. कापूस, कागदी खपट, पाईप, कापडी पिशव्या आदी साहित्याचा कल्पकतेने वापर करून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. पारंपरिक सजावटीपेक्षा वेगळी संकल्पना राबवत तयार केलेली ही गणेशमूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता वाढली असून, मंडळाच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com