

Hingoli News
esakal
माटेगाव: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होताना दिसत आहे. अमेरिका - इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून, आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या आठवडाभरात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो १२ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.