नाम फाउंडेशनकडून शिक्षणासाठी मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला, विद्यार्थ्यांना दिलासा
औरंगाबाद - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशनच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षण, शैक्षणिक संस्थांनी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. गरजू महिला, विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक संस्थांनी काम देण्यासोबतच राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही केली आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील, तसेच गरीब, गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी "नाम'च्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षामध्ये औरंगाबादेतील विविध इन्स्टिट्यूट, प्रशिक्षण, शैक्षणिक संस्थांमध्ये दहावीनंतर दोन वर्षे आय.आय.टी. / ए.आय.एम.एस. पूर्वतयारीसाठी 10 जागा, राहण्या-जेवणाची व्यवस्था, अभियांत्रिकीच्या 7, नर्सिंगच्या 3, डी.टी.एड.च्या 2, पॉलिटेक्‍निकच्या 5, बी.सी.एस.च्या 5 जागा राखीव ठेवल्या आहेत.

बीड जिल्ह्यात पहिली ते बारावीसाठी 200 जागा आहेत. नाशिक जिल्ह्यात अभियांत्रिकीच्या 10 जागा, सोबत राहण्या-जेवणाची व्यवस्था, नगर जिल्ह्यात अभियांत्रिकीच्या 60, पॉलिटेक्‍निकच्या 86, एम.बी.ए.च्या 24, डी.टी.एड.च्या 10, बी.एड.च्या 2 जागा आहेत. परभणी जिल्ह्यात सातवी ते बारावीसाठी राहण्या-जेवणाच्या व्यवस्थेसह काही जागा आहेत. सातारा जिल्ह्यात दहावीनंतर पदवीपर्यंत कुठल्याही शाखेसाठी 250 जागा आणि राहण्या-जेवणाची व्यवस्था आहे. बार्शी येथे पाचवी ते बारावीसाठी काही जागांवर व्यवस्था आहे.

ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी पैशाअभावी मागे राहू नयेत, त्यांनासुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा नाम फाउंडेशनचा या योजनेमागील उद्देश असून, जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नाम फाउंडेशनच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयाशी (9112126156) संपर्क करावा किंवा connect@naammh.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे विश्‍वस्त शुभा महाजन यांनी कळवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education help by naam foundation