पाचोड - 'शिक्षण हेच वाघीणीचे दुध आहे, जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही' हे ब्रीद ओळखून शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून पाचोड (ता. पैठण) येथील सव्वीस वर्षीय युवक अजिंक्य अशोकराव डोईफोडे गेल्या दहा वर्षापासून सहा शाळेतील जवळपास अकराशे विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या वह्यांचे कोणाताही गाजावाजा न करता मोफत वाटप करून आपली परंपरा कायम ठेवत आहे.