विद्यापीठाच्या चुकांचा विद्यार्थ्यांना भुर्दंड

शुल्कासह अर्ज करण्याचा सल्ला, विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप
education news university mistakes Errors in mark sheet Students face problems Advise to pay fees for application jalna
education news university mistakes Errors in mark sheet Students face problems Advise to pay fees for application jalnasakal

जालना : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) प्रशासनाने पदवी परीक्षेचे निकाल जाहीर केले.परंतु गुणपत्रिकेत चुका झाल्याने विद्यार्थी पास तर श्रेणी शून्य असा प्रकार घडल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत असताना विद्यापीठ प्रशासनाने शुल्क भरून गुणपडताळणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या चुकांचा विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

विद्यापीठाच्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना का असा प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. विद्यापीठाच्या परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए. अशा विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही गुणपत्रिकेवर काही विषयात शून्य गुण दाखवण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आक्षेप घेतल्यानंतर विद्यापीठाने पत्र काढत गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी शुल्क भरून अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

गोंधळानंतर निकालात बदल होऊ शकतो, पाच-दहा टक्के निकालच असे होऊ शकते. निकालात सुधारणा करण्याचा पर्याय असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले आहे. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करावयाचे आहेत, त्यांनी तो दिलेल्या मुदतीत आपल्या महाविद्यालयात अर्ज सादर करावेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थीतीत अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा अंतिम ता. ३० ऑगस्ट आहे. यासाठी प्रती पेपर ५० रुपये रिकाऊंटीग शुल्क आहे. उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा अंतिम ता.२३ ऑगस्ट आहे, यासाठी प्रती पेपर २०० रुपये शुल्क आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख २८ ऑगस्ट आहे. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त झाल्यापासून ५ दिवसांत संबंधितास याबाबतचे उत्तर मिळेल. महाविद्यालयाने विद्यापीठास सादर करण्याचा अंतिम मुदत कळविण्यात आली आहे.

उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत अर्ज प्राप्त झाल्यापासून ८ दिवसात मिळेल. विद्यापीठ प्रशासनाची चूक असताना नाहक भुर्दंड विद्यार्थ्यांना पडत असल्याने पालक,संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांना विचारणा करीत असले तरी चूक आमची नसून विद्यापीठाची असल्याचे प्राचार्याचे म्हणणे आहे.

विद्यार्थी निकाल गुणपत्रिकेत जर विद्यापीठाची चूक असेल तर ती दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुल्काचा भुर्दंड कशासाठी असा प्रश्‍न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक भार पडणार असेल तर चुकीबद्दल कुणाला दोषी ठरवायचे,असा प्रश्न आहे.

- डॉ.मारोती तेगमपुरे, राज्य कार्यकारी मंडळ सदस्य, एमफुक्टो संघटना

आमच्या महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाचे काही विद्यार्थी विचारणा करण्यासाठी आले होते. विद्यापीठाने रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंग याबाबत तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी ऑनलाइन किंवा थेट माहिती भरू शकतात.

- डॉ.एस.बी.बजाज, प्राचार्य, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com