Education Protest: शिक्षण विभागात तांत्रिक छेडछाड व अनधिकृत वेतन वितरणाबाबत संघटनेची गंभीर तक्रार; शासनाकडे कठोर कारवाईची मागणी
Fake Salary ID: नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडीचा सायबर स्कॅम उजेडात आल्याने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. त्यांनी खऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीड : शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. आठ) सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. याचा परिणाम नियमित कामकाजारावर झाला.