esakal | परभणीत आठ मृत्यु, ५२ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी शहरातील सहा केंद्र, सात खासगी रुग्णालयात व प्रभाग समिती अ, ब, क तर्फे ३५३ नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ३३३ जण निगेटिव्ह तर २० जण पॉझिटिव्ह आढळले. तसेच दिवसभरात जिल्हाभरात ५२ पॉझिटिव्ह आढळले तर आठ जणांचा मृत्यू झाला. 

परभणीत आठ मृत्यु, ५२ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाबाधित आठ पुरुषांचा आज मृत्यु झाला. मृतांची संख्या १७६ झाली आहे. दरम्यान, नव्याने ५२ रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. तर ६७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. रुग्णसंख्या चार हजार २४९ झाली असून तीन हजार २२७ रुग्ण बरे झाले आहेत. ८४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा - Video - नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने सात मंडळात अतिवृष्टी 

परभणीत वीस, पूर्णेत नऊ बाधित आढळले 
परभणी शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी शहरातील सहा केंद्र, सात खासगी रुग्णालयात व प्रभाग समिती अ, ब, क तर्फे ३५३ नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ३३३ जण निगेटिव्ह तर २० जण पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, पूर्णा तालुक्यात ९६ संशयितांची कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात नऊजण कोरोनाबाधित आढळले. शहरातील कोविड केअर सेंटरवर मंगळवारी (ता.१५) बावीस संशयितांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात दोनजण कोरोनाबाधित आढळले आहेत. शिक्षक कॉलनीमधील ३६ वर्षीय महिला व ताडकळस येथील २८ वर्षीय पुरुष बाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ७४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात आहेरवाडी येथील सातजण बाधित आढळले. त्यात ५५, ५२, ५०, ४८ वर्षीय पुरुष व ४८, ४५ महिलेसह नऊवर्षीय बालिका बाधित आढळली.

हेही वाचा - धक्कादायक : बारडच्या कोविड केंद्रातून बाधित रुग्ण पळाला, गुन्हा दाखल

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची कोविड सेंटरला भेट 
जिंतूर ः आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शहरातील कोविड सेंटर येथे सोमवारी (ता.१४) भेट दिली. या वेळी तेथील उपाययोजनांची माहिती घेतली. नगरपालिकेकडून कोविड सेंटरला दुषित पाणीपुरवठा केला जात असल्याचे समजले असताना त्यांनी तत्काळ तहसिलदार यांच्याशी संपर्क करुन यासंदर्भात योग्य पाऊल उचलून कोविडग्रस्तांना स्वछ पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर कोरोनाला हरवण्याची आहे. त्यामूळे नगरपरिषदेने कोरोना सेंटरला वेळेच्या वेळी व स्वछ पाणीपुरवठा करावा असेही त्या म्हणाल्या. या वेळी डॉ.पंडीत दराडे, अब्दुल रहेमान, अमोल देशमुख, नागेश आकात उपस्थित होते. 

मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतची आकडेवारी

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - चार हजार २४९ 
आजचे बाधित - ५२ 
आजचे मृत्यु - आठ 
एकूण बरे - तीन हजार २२७ 
उपचार सुरु असलेले - ८४६ 
एकूण मृत्यु - १७६

संपादन ः राजन मंगरुळकर