औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. सकाळ

Jyotirling : पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांविना नागनाथाची पूजा

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : येथील आठवे ज्योतिर्लिंग (Eighth Jyotirling) नागनाथ मंदिरात (Nagnath Temple) श्रावणातील पहिल्या सोमवारी (ता.नऊ) नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सहा वाजता करण्यात आली. औंढा नागनाथ मंदिर कोरोना संसर्गजन्य (Corona) रोगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पुजारी व शारीरिक अंतर ठेवून संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार डाॅ.कानगुले व त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्या हस्ते शासकीय (Aundha Nagnath) महापूजा झाली. यावेळी त्यांनी देशावर ओढवलेले कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे नागनाथाला घातले. वेदपठण पुजारी नारायण भोपी, पद्माक्ष पाठक, नागनाथ जोशी, रामेश्वर क्षीरसागर यांनी केले. यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक वैजेनाथ पवार, बापुराव देशमुख उपस्थित होते.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी नागनाथाची शासकीय महापूजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
पोलिस अधिकाऱ्याची दादागिरी! रिक्षाचालकाला शिवीगाळ करित मारले

दरम्यान, श्रावणातील सोमवारी येथे कावड दिंड्या, पताका घेऊन हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. परंतु यंदा कोरोनाच्या साथीमुळे सर्व काही बंद असल्याने व संसर्ग टाळण्यासाठी मंदिरेही बंद ठेवण्यात आल्याने यावर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच देवस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे, की कोरोनाच्या संकटामुळे नागनाथ मंदिर हे बंद आहे. तरी भाविकांनी नागनाथ परिसरामध्ये गर्दी करू नये असे आवाहन देखील डाॅ.कानगुले यांनी केले आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक आनिल लांडगे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, एसआरपीएफ तुकडी व पोलिस कर्मचारी यांनी मंदिर परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com