esakal | परभणी शहरात नवे आठ जलकुंभ कार्यान्वीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तीन जलकुंभांची कामे प्रगतीपथावर, पाच प्रभागात पूर्णतः नविन योजनेचे पाणी

परभणी शहरात नवे आठ जलकुंभ कार्यान्वीत

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणीः महानगरपालिकेच्या नविन पाणी पुरवठा योजनेतील आठ जलकुंभांची कामे पूर्ण झाली असून काही जलकुंभातून पाणी वितरण देखील सुरु झाले आहे. तीन जलकुंभांचे का प्रगतीपथावर असून फेब्रुवारी महिण्यापर्यंत या
देखील जलकुंभांचे काम पूर्ण होऊन त्यातून विविध वसाहतींना पाणी पुरवठा होणार आहे. शहराच्या 16 पैकी पाच प्रभागात जुनी पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आली असून नविन जलवाहिण्यांद्वारे पाणी पुरवठा सुरु झाले आहे.


महानगरपालिकेच्या युआयडीएसएसएमटी व अमृत योजनेतून शहराच्या विविध भागात नऊ जलकुंभ उभारण्यात आलेले असून दोन जलकुंभांची कामे सुजल निर्मण योजनेअंतर्गत सुरु आहेत. तर जुने चार जलकुंभ असून शहराला येत्या फेब्रुवारी महिण्यापासून एकूण 16 जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा होणार असल्याने विस्कळीत असलेला पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. शहरातील शिवनेरीनगर, दर्गा रोड चष्मे-अबे-हयात, गंगाखेड रोड, कृषीनगर, एम.आय.डी.सी, पार्वतीनगर, विद्यानगर येथील जलकुंभ कार्यान्वीत झालेले आहेत. मुख्य जलवाहिण्या देखील या जलकुंभांना जोडण्यात आलेल्या असून शहरात अनेक भागात वितरणासाठी चाचण्या सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा -  परभणी : पारंपरिक पिकांना फाटा देत पपई लागवडतून दोन लाखाचे उत्पन्न

पाच प्रभागातील जुनी पाणीपुरवठा योजना पू्र्णतः बंद

शहरातील नागरीकांनी अजुनही नळजोडण्यांकडे दुर्लक्ष केले असले तरी ज्या भागात जुनी नळयोजना नव्हती किंवा काही भागात होती,  त्या भागातील नागरीकांनी मात्र मोठ्या प्रमाणावर नळजोडण्या घेतल्या आहेत. त्यामुळे शहराच्या प्रभाग क्रमांक 10,11,12,13 व 16 या पाच प्रभागात जुनी वितरण व्यवस्था पूर्णतः बंद करण्यात आली असून नव्या जलवाहिण्यातून पाणी वितरण केले जात आहे. तर रविवार (ता.तीन) पर्यंत शहराच्या एक व दोन क्रमांकाच्या प्रभागात देखील जुनी वितरण व्यवस्था बंद करून नविन पाणी पुरवठा योजनेतून पाणी वितरीत केले जाणार आहे. तर अन्य प्रभागात ज्या भागात नळजोडण्या अधिक झाल्या, त्या भागात नवीन योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे.

तीन जलकुंभांची कामे प्रभागतीपथावर

सुजल निर्मल योजनेत तत्कालीन नगरपालिकेला दोन जलकुंभ मंजुर झाले होते. जलवळपास दहा वर्षापासून रखडलेल्या या जलुकंभाचे काम आता जलदगतीने सुरु आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ ता. 26 जानेवारीपर्यंत तर अमेयनगर येथील जलकुंभाचे काम 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होईल.
- मिर्झा तनवीर बेग, अभियंता, पाणी पुरवठा विभाग महापालिका

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image