बीड जिल्ह्यातील जवानचा अपघाती मृत्यू

प्रकाश काळे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सीमा सुरक्षा दलात पाच वर्षांपासून कार्यरत असलेले जवान परमेश्वर बालासाहेब जाधवर यांचा विशेष प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू

किल्लेधारूर, (जि. बीड) :  तालुक्यातील घागरवाडा येथील सुपुत्र व सीमा सुरक्षा दलात पाच वर्षांपासून कार्यरत असलेले जवान परमेश्वर बालासाहेब जाधवर  (वय 25) यांचा विशेष प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात मंगळवारी (ता.१९) सायंकाळी मृत्यू झाला.

 

राजस्थानमध्ये सीमा सुरक्षा दलाचे विशेष प्रशिक्षण सुरू होते. यामध्ये झालेल्या अपघातात आठ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र, यामध्ये बीड जिल्ह्यातील किल्लेधारुर तालुक्यातील घागरवाडा या गावातील जवान परमेश्वर जाधवर असल्याच्या माहितीला प्रशासकीय अधिकारी यांनी दुजोरा दिला.

 

जवान  जाधवर  यांच्या निधनाचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, आईवडील, तीन भाऊ असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight Soldier killed in accident