esakal | आठ कारखान्यांचा पडला पट्टा 
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar mill photo.jpg

नांदेड विभागात गाळप हंगाम २०१९ - २०२० मध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांत ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गाळप सुरू झाले. विभागात पाच सहकारी, तर १२ खासगी, अशा १७ कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते.

आठ कारखान्यांचा पडला पट्टा 

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील तेरा पैकी आठ कारखाने बंद झाले आहेत. विभागात आजपर्यंत २७ लाख ६७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. तर २९ लाख ७० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.

विभागात तेरा कारखान्यांनी केले गाळप 
नांदेड विभागात गाळप हंगाम २०१९ - २०२० मध्ये लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्यांत ता. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी गाळप सुरू झाले. विभागात पाच सहकारी, तर १२ खासगी, अशा १७ कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी पाच सहकारी व आठ खासगी, अशा एकूण १३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, तर परभणीमधील रेणुका शुगर व महाराष्ट्र शेतकरी हे दोन कारखाने, लातूर जिल्ह्यातील साईबाबा व टेंव्टीवन या दोन, अशा एकूण चार खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले नव्हते. 

हेही वाचा....Video:अशोक चव्हाण म्हणाले, अत्यंत चिंताजनक....काय ते वाचा..

हंगाम लवकरच आटोपणार
विभागात सर्वप्रथम ता. २६ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू केलेल्या १३ कारखान्यांनी आजपर्यंत २७ लाख ६७ हजार ६४१ टन उसाचे गाळप केले आहे, तर साखरेचे उत्पादनही २९ लाख ६९ हजार ६८५ क्विंटल झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.७३ टक्के आला आहे. सध्या सुरु असलेल्या पाच कारखान्यांचा गाळप हंगामही लवकरच आटोपणार असल्याचे संकेत आहेत. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता गाळप हंगाम लवकरच आटोपेल.

हेही वाचलेच पाहिजे....कसा आसेल महाराष्ट्रात बंद

बंद झालेले साखर कारखाने 
त्रिधार शुगर व योगेश्वरी शुगर (परभणी), पूर्णा सहकारी, टोकाइ सहकारी व शिऊर लि. (हिंगोली), भाऊराव सहकारी युनीट क्र, चार, कुंटूरकर शुगर व व्यंकटेश्वरा ॲग्रो शुगर (नांदेड). 

‘बळिराजा शुगर’ची गाळपात आघाडी कायम
नांदेड विभागात ऊस गाळप व साखर उत्पादनात परभणी जिल्ह्यातील बळिराजा शुगर हा खासगी कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने गाळपातील आघाडी कायम ठेवत आजपर्यंत चार लाख आठ हजार ९१५ टन उसाचे गाळप केले आहे, तर साखरेचे उत्पादनही चार लाख ६७ हजार सातशे क्विंटल झाले आहे.

नांदेड विभागातील आजपर्यंतचे गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनमध्ये, साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा............ऊस गाळप.........साखर उत्पादन
परभणी..........६, १६, ४१४........६, ६८, ३६०
हिंगोली..........७, ६७, १०१........८, ३७, ८००
नांदेड............८, ११, ४१५........८, ६४, ८२५
लातूर............५, ७२, ७१०........५, ९९, ०००
एकूण..........२७, ६७, ६४१.......२९, ६९, ९८५
विभागाचा सरासरी साखर उतारा १०.७३ टक्के