Video:अशोक चव्हाण म्हणाले, अत्यंत चिंताजनक....काय ते वाचा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. तर ती आता खऱ्या अर्थाने सुरु झाली झाली आहे. त्यामुळे शासनाचे निर्देश पाळावेत त्याचबरोबर प्रवास टाळावा आणि गर्दी करु नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. 

Video:अशोक चव्हाण म्हणाले, अत्यंत चिंताजनक....काय ते वाचा..

नांदेड : जमावबंदीचा आदेश धुडकावून नागरिक रविवारी (ता. २२) संध्याकाळपासून ज्या पद्धतीने पुन्हा रस्त्यावर येत आहेत. ते चिंताजनक आहे. कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. तर ती आता खऱ्या अर्थाने सुरु झाली झाली आहे. त्यामुळे शासनाचे निर्देश पाळावेत त्याचबरोबर प्रवास टाळावा आणि गर्दी करु नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

हे ही वाचा व पहा - Video : नांदेडकरांनो सावधान, जिल्ह्यात १४४ कलम लागू- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

देशात आणि राज्यात कोरोनाविरुद्ध लढाई सुरु असताना केंद्र व राज्य सरकार तसेच प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र, नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेला घरी बसण्याचे आवाहन केले आहे. 
 
सर्वात कठीण काळ आता सुरु
देशात आणि राज्यात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे. सर्वात कठीण काळ आता सुरु झालेला आहे. त्यामुळेच राज्यात आता जमावबंदी आदेश लावण्यात आले आहेत. तरी देखील जमावबंदी आदेश धुडकावून नागरिक काल सायंकाळपासून ज्या पद्धतीने रस्त्यावर येत आहेत, ते चिंताजनक असल्याचे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.  

हे ही वाचा - येथील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाची वाट
सामजस्यांने वागा, संयम ठेवा...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, असे सांगून पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, जनता कर्फ्यूमध्ये ज्या पद्धतीने सहभाग घेतला त्याच पद्धतीने चित्र ठेवा. मात्र, काही जण रस्त्यावर पुन्हा येत आहेत. ते चित्र गंभीर आहे. लढाई अजूनही संपलेली नाही. सर्वांना विनंती की, परिस्थितीची जाणीव ठेवा. एक चूक फार मोठा धोका निर्माण व्यक्त करु शकते. सामजस्यांने वागा, संयम ठेवा आणि चांगला निर्णय घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका, वर्दळ, गर्दी बंद झाली पाहिजे. रेल्वे, बससेवा व विमानसेवा देखील बंद आहे. जमावबंदीचे आदेश आहेत. त्याचे पालन करा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे. 

कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची
अत्यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर घरी बसून रहा. घरीच मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन करुन श्री. चव्हाण म्हणाले की, विनाकारण घराबाहेर पडून नवीन प्रश्‍न तयार करु नका. कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आगामी ता. ३१ मार्चपर्यंत घराबाहेर पडू नका, पालकमंत्री म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. त्यामुळे सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे. 

 
 

loading image
go to top