esakal | खडसेंनी खडसावले; यशाचे श्रेय घेता तशी अपयशाचीही जबाबदारी घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांचा पराभव भाजमधील नेत्यांनीच घडवून आणल्याचा थेट आरोप त्यांनी यापूर्वीही केला हेाता.

खडसेंनी खडसावले; यशाचे श्रेय घेता तशी अपयशाचीही जबाबदारी घ्या

sakal_logo
By
प्रा. प्रविण फुटके

परळी (जि. बीड) : भाजपातील जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ डसे यांनी पक्षातील नेत्यांनेत्यांना पुन्हा खडसावले आहे. ''पक्षातील काही लोकांनी आमचा पराभव केला. याचे पुरावे चार दिवसांपूर्वीच पक्षाकडे दिले आहेत. भाजपची घसरण १०५ जागांवर का झाली याचे चिंतन करावे. जशी यशाचे श्रेय घेता तशी अपयशाचीही जबाबदारी स्वीकारा,'' असा टोला भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

परळी परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे समर्थकांसह शहरात पोचले आहेत. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपवरील नाराजी थेट बोलून दाखवित आहेत. पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांचा पराभव भाजमधील नेत्यांनीच घडवून आणल्याचा थेट आरोप त्यांनी यापूर्वीही केला हेाता.

पंकजा मुंडे काय बोलणार - क्लिक करा आणि वाचा

गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी भाजपने काहीच हालचाल केली नसल्याचाही थेट आरोप खडसे यांनी केला हेाता. दरम्यान, आता गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीसाठी आलेल्या खडसे यांनी पुन्हा आपली खदखद उघड केली. गोपीनाथराव मुंडे अडचणीच्या काळात धावून येणारे नेतृत्व होते. गोपीनाथ मुंडे व तत्कालीन नेत्यांमुळे भाजप बहूजनांचा पक्ष झाला. 

भाजपची १०५ जागांवर घसरण का झाली याचे चिंतन करुन यशाचे श्रेय घेता तशी अपयशाची जबाबदारी घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. यश - अपयश येणार पण त्याची जबाबदारी नेतृत्वाने घ्यावी. भाजपला ओबीसी व बहुजन समाजाला विश्वास द्यावा लागेल. 
- एकनाथ खडसे, ज्येष्ठ भाजप नेते 

loading image
go to top