Eknath Shinde: फुकटचा टाटा, नाव उबाठा! एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका
Eknath Shinde Criticism of Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी व जालन्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरेवर टीका केली. शेतकऱ्यांसाठी मदतीच्या पॅकेजवरही विरोधकांचा आरोप, शिंदे म्हणाले ‘फुकाचा ताठा-उबाठा’.
परभणी / जालना : ‘‘राज्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी सध्या बिनकामाचे लोक फिरत आहेत. हेच लोक परभणीतही आले होते. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही म्हणणारे केवळ फुकटचा टाटा आणि नाव उबाठा असणारे लोक आहेत.