Eknath Shinde: कार्यकर्त्यांना ‘ते’ सालगडी समजायचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray: हिंगोली कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. भगवा दहशतवादाच्या आरोपांवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
कळमनुरी (जि. हिंगोली) : ‘‘त्यांनी खुर्चीसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व हिंदुत्वाचे विचार सोडले. हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी काढण्यात येणाऱ्या प्रसिद्ध कावड यात्रेचे आमंत्रण मिळूनही पूर्वीच्या नेत्यांनी पाठ फिरविली.