Lohgaon Crime : दारूच्या नशेत शिवीगाळ व त्रास देत असल्याने मोठ्या भावानेच लहान भावाचा केला खून; बिडकीन पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा

पैठण तालुक्यातील खामजळगाव शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला.
Elder Brother killed Younger Sibling Over Drunken Abuse and Harassment shriram erande

Elder Brother killed Younger Sibling Over Drunken Abuse and Harassment shriram erande

sakal

Updated on: 

- ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव - पैठण तालुक्यातील खामजळगाव शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला. दारू पिऊन आई-वडील व भावाला वारंवार शिवीगाळ करून त्रास देत असल्याच्या कारणावरून मोठ्या भावानेच लहान भावाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...