sugarcane fire
sakal
आशिव - मेहनतीने सहा महिने राबून उभा केलेला ऊस काही क्षणांतच ज्वाळांनी गिळंकृत केला. आशिव गावातील संतोष बबन इंगळे, विक्रम बब्रुवान इंगळे, व्यंकट रखमाजी माने आणि वसंत रखमाजी माने या शेतकऱ्यांच्या शेतात बुधवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत सुमारे दहा ते बारा एकरांतील ऊस पूर्णतः जळून खाक झाला असून शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.