वीजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू अन् दोन शेळ्या दगावल्या, चाकूर तालुक्यातील घटना

वीजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू अन् दोन शेळ्या दगावल्या, चाकूर तालुक्यातील घटना

चापोली (जि.लातूर) : अजणसोंडा बुद्रूक (ता. चाकूर) येथे मंगळवारी (ता.सात) शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. यात दोन शेळ्या ही जागीच दगावल्या. मृत शाळकरी मुलाचे संदीप बंडू तेलंगे असे नाव आहे. सोमवारी (ता.सहा) सायंकाळी अजणसोंडा परिसरात जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस पडला होता. यात रामराव तुकाराम झोले यांच्या शेतातील शेतीसाठी विद्युत पुरवठा करणारी विद्युत तार रात्रीच तुटून पडली होती. मात्र त्यात विद्युत पुरवठा सुरूच होता. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संदीप तेलंगे हा मुलगा आपल्या दोन शेळ्या चारण्यासाठी त्यांच्या शेतात आला होता. तुटून पडलेल्या विद्युत ताराला स्पर्श होऊन दोन्ही शेळ्या जाग्यावर दगावल्या. संदीपला हे लक्षात आले नाही. त्याने तो विद्युत तार बाजूला सरकवण्यासाठी स्पर्श करताच त्याचा ही जागीच मृत्यू झाला. घटना कळताच पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या आदेशावरून बीट जमादार सुभाष हरणे, माधव सारोळे, सुकेश केंद्रे पशुधन अधिकारी डॉ.अंकुश पाटील, डॉ. विजयकुमार सरोदे यांनी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

स्वॅबचा अहवाल लिक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई
लातूर : निलंगा येथे एका धार्मिकस्थळामध्ये आढळून आलेल्या बारापैकी आठ परप्रांतीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. याबाबत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेला अहवाल सोशल मीडियावर लिक करण्यात आला. हा अहवाल फोडणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. हा अहवाल फॉरवर्ड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.


बारा परप्रांतीयांचा प्रवासाचा इतिहास लक्षात घेता त्यांच्या घशातील द्रावाचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. शनिवारी (ता.चार) त्याचा अहवाल आला. मात्र, हा अहवाल सोशल मीडियावर लिक झाला. यामुळे मीडियावर चर्चा घडून आली. कोरोनाबाधित रूग्णांची नावे व तपशील उघड करण्यास सरकारने बंदी घातली आहे. मात्र, अहवाल लिक झाल्याने रूग्णांची नावे उघड झाली. यातून काही लोकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोरोनापेक्षाही भयंकर होता. हा अहवाल अनेकांनी फॉरवर्ड करून खतपाणी घातले. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अहवाल फोडणाऱ्यांविरूद्ध पहिल्यांदा कारवाई करण्यात येणार आहे. त्याचा शोध पोलिस घेत असून हा अहवाल सोशल मीडियावर फॉरवर्ड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशांचाही शोध घेऊन सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

आता सोलापूरला तपासणी
जिल्ह्यात संशयित कोरोनाबाधित रूग्णांच्या स्वॅबचे नमुने काढण्याची सोय केवळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतच होती. आता उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयातही ही सोय करण्यात आली आहे. स्वॅबचे नमुने पूर्वी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. यामुळे अहवाल येण्यासाठी चोवीस तास लागायचे. आता नमुने तपासणीसाठी सोलापूरला सुविधा करण्यात आली असून कमी वेळेत अहवाल येणे शक्य होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी या वेळी सांगितले. दरम्यान यंत्रसामग्री आली नसल्याने लातूर येथे तपासणीची सुविधा सुरू करण्यासाठी उशिर होत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com