अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील मार्डी, धनगरपिंपरी, हारतखेडा, मठपिंपळगावसह आदी ठिकाणी वीजेचे सिमेंटचे पोल जमिनीवर तुटुन आडवे पडले आहे. याचबरोबर विजेच्या तारा तुटल्या आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांचे सतत दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.