विजतार अंगावर पडून मुलाचा मृत्यू, महावितरणाचा हलगर्जीपणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

वीजतार अंगावर पडल्याने रतीलाल श्रावण पवार (वय 14) या मजुर मुलाचा मृत्यू झाला. ही घटना उप्पलखेडा (ता. सोयगाव) येथे गुरुवारी (ता.19) सायंकाळी घडली. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

बनोटी (जि.औरंगाबाद) ः वीजतार अंगावर पडल्याने रतीलाल श्रावण पवार (वय 14) या मजुर मुलाचा मृत्यू झाला. ही घटना उप्पलखेडा (ता. सोयगाव) येथे गुरुवारी (ता.19) सायंकाळी घडली. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

हेही वाचा- शर्टच्या बटनमुळे पोलिस पोचले मारेकऱ्यांपर्यंत! 

घरची हलाखीची परिस्थिती. त्यात वडिलांचा मृत्यू झाल्याने शाळेत जाण्याच्या वयात शेतात काबाडकष्ट करून उदरनिर्वाह भागविण्याची वेळ रतीलालसह त्याच्या मोठ्या भावावर आली. मोठा भाऊ ऊसतोडणीसाठी गेल्याने घरी रतीलाल, त्याची आई असे दोघेच होते. आईला हातभार लावण्यासाठी रतीलाल बाल वयातच मजुरी करु लागला. गुरुवारी आठवडे बाजार असल्याने तो काम करून पाच वाजता घरी परतला व लगेच बाजारला निघाला. वीजतारांखालुन जाताना अचानक त्याच्या मानेवर वीज तार पडून तो गंभीररित्या भाजला. तेथील जगन चव्हाण, विजय पवार, ग्यानचंद पवार यांनी लाकडी दांड्याने वीजतार बाजुला करीत रतीलालची सुटका केली. त्यास गोंदेगाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून उपचारासाठी पाचोरा येथे नेण्यात सांगितले. खासगी वाहनाने पाचोरा येथे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचाच- सास्तूरच्या ग्रामस्थांनी केले गाव बंद, हे होते कारण...

तारा बदलण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

नविन रोहीत्र बसवुन उप्पलखेडा गावाला वीजपुरवठा केला जातो. नविन रोहीत्राजवळ कायम वीजेच्या ठिंणग्या उडून लख्ख प्रकाश पडतो. याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीस विजपुरवठा करणाऱ्या तारा बदलून नविन जोडणी करण्याकरीता लेखी, तोंडी सूचना केल्या होत्या. मात्र, वीज वितरण कंपनीने सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

हे वाचलंत का?- Video : दिव्यांगांचे संसार उभे करणारा दिलदार ग्रुप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Shocked Killed Boy Soygaon