आनंद वार्ता : उदगीरचे अकरा रुग्ण कोरोनामुक्त

युवराज धोतरे
सोमवार, 25 मे 2020

उदगीरकरांसाठी सोमवारी (ता. २५) आनंदाची बातमी आरोग्य विभागाने दिली असून, २५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभाग त्यांना घरी पाठवीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.

उदगीर (जि.लातूर) : उदगीरकरांसाठी सोमवारी (ता. २५) आनंदाची बातमी आरोग्य विभागाने दिली असून, २५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभाग त्यांना घरी पाठवीत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास यांनी दिली. दिवसेंदिवस शहर व तालुक्यातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील बोरताळा तांडा, सोमनाथपूर, कासराळ, चिमाचीवाडी, हंगरगा, लोणी व सोमनाथपूर या सहा गावांत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्याने ही गावे सील करण्यात आली आहेत.

उदगीर, जळकोट व परिसरातील आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ५७ आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकोणचाळीस जणांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आले असून, सध्या उदगीरच्या कोरोना रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय व नातलगांची तपासणी करून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात येत आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत फुलांनी स्वागत करून या दहा रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हरिदास यांनी दिली.

‘एसबीआय’चे क्षेत्रीय कार्यालय लातूरलाच ठेवा, अर्थमंत्र्यांना साकडे

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
राज्याचे पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घरी पाठविण्यात आलेल्या रुग्णांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. रुग्णांची विचारपूस करून कोरोनामुक्त झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven Patient Corona Free In Udgir Latur News