हिंगोलीत शुक्रवारी अकरा जणांना कोरोनाची बाधा

राजेश दारव्हेकर
Saturday, 18 July 2020

वसमत येथील शुक्रवार पेठेतील ५२ वर्षिय स्त्रि , ३४ पुरुष , ३ व १५ वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती २९ वर्षीय स्त्रि , २८ वर्षे स्त्री, ३० वर्ष पुरुष तर ३३ वर्षीय स्त्रि बहिर्जीनगर, कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे.  

हिंगोली : आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्हांतर्गत नव्याने ११ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले असल्याची  माहिती कोरोना केअर सेंटर्स ईन्चार्ज वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. १७) दिली आहे.

दिलेल्या माहितीनुसार  हिंगोली येथील ३४ वर्षीय पुरुष पलटन गल्ली , आय.एल.आय ( सर्दी , खोकला ,  ताप ) असल्यामुळे कोरोनाची तपासणी करण्यात आली. ३२ वर्षीय पुरुष नारायणनगर येथील आय.एल.आय ( सर्दी, खोकला, ताप ) असल्यामुळे कोरोना तपासणी करण्यात आली. वसमत येथील शुक्रवार पेठेतील ५२ वर्षिय स्त्रि , ३४ पुरुष , ३ व १५ वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती २९ वर्षीय स्त्रि , २८ वर्षे स्त्री, ३० वर्ष पुरुष तर ३३ वर्षीय स्त्रि बहिर्जीनगर, कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे.  

 शुक्रवारी नव्याने ११ कोरोना रुग्ण आढळुन आले

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील ४८ वर्षीय स्त्रि  कोरोना रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कोरोना केअर सेंटर वसमत         अंतर्गत १ कोरोना रुग्ण ( जय नगर ) बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
आज रोजी नव्याने ११ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत आणि एक कोरोना रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत       हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकुण ३८४ रुग्ण झाले आहे . त्यापैकी २९४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन   नऊ रुग्णांवर उपचार चालु आहेत.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यासाठी नविन १६ रुग्णवाहिकांची खरेदी- पालकमंत्री नवाब मलिक

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २४ कोरोना रुग्ण आहेत

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २४ कोरोना रुग्ण आहेत यात ( १ रिसाला बाजा , १ गांधी चौक, १ जि.एम.सी.नांदेड ( आझम कॉलनी ) , १ धुत औरंगाबाद ( ब्राम्हण गल्ली वसमत ), १ पेडगाव, ३ शुक्रवार पेठ, १ नवलगव्हान, ३ तलाबकट्टा, २ दौडगाव ,१ गवळीपुरा , १ पेन्शनपुरा , १ अंजनवाडी , १ सेनगाव , १ जयपुरवाडी , १ नवा मोंढा ,  कासारवाडा , १ आझम कॉलनी , १ पलटन , १ नारायण नगर )

येथे आहेत बाधीत दाखल

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये २९ कोरोना रुग्ण आहेत यात ( १ वापटी , १४ शुक्रवार पेठ , ३ स्टेशन रोड , १ सोमवार पेठ , ५ सम्राट नगर , १ अशोक नगर , १ गणेशपेठ , १ पारडी , १ गुलशन नगर , १ बहिर्जी नगर ) येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन ५ कोरोना रुग्ण आहेत यात ( ३ नवी चिखली , १ शेवाळा , १ नांदापुर ) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत . या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत . कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत २ ९ कोरोनाचे रुग्ण आहेत त्यात  ( १ तलाब कट्टा , १ भांडेगाव , १ हनवतखेडा , ४ कळमकोंडा , १४ पेडगाव , ५ रामादेऊळगाव , २ पहेणी , १ माळधामणी ) उपचारासाठी भरती आहेत . त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 

क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ६२२६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे

कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे २ कोरोनाचे  रुग्ण आहेत  ( २ वैतागवाडी ) उपचारासाठी भरती आहे . कोरोना केअर सेंटर औंढा येथे १ कोरोना  रुग्ण ( अंजनवाडी ) उपचारासाठी भरती आहे . हिंगोली जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ६२२६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे . त्यापैकी ५५३७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत . ५३७६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ८३८ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी ३५७ अहवाल येणे व  थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे . 
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय  येथे भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे . तसेच २ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे . अशा प्रकारे ६ कोरोना  रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे

येथे क्लिक कराकोरोना आपत्ती काळात गुरुद्वारा बोर्डास आर्थिक मदत द्या- शीख समाजाची मुख्यमंत्र्याकडे मागणी
 
६६ वर्षीय पुरुष राहणार भाजीमंडी कळमनुरी यांचा कोरोना च्या आजाराने मृत्यु

आज रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे एका ६६ वर्षीय पुरुष राहणार भाजीमंडी कळमनुरी यांचा कोरोना च्या आजाराने मृत्यु झाला आहे . सदरील     रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि श्वासाचा आजार असे को- मोर्बिट कंडीशन होत्या . 
हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , अत्यंत इमरजन्सी असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven people were hit by a corona in Hingoli on Friday hingoli news