Jalna Floods: पात्र आकसल्याने नद्या कोपल्या; जालन्यात अतिक्रमणे काढण्यासह उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ
Jalna News: जालना शहरातील सीना-कुंडलिका नदीपात्रातील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रशासनात गुऱ्हाळ रंगल्यामुळे अतिवृष्टीमध्ये शहरात पाणी शिरले. ब्ल्यू, रेड लाइन आखणी न झाल्यामुळे उपायरीत उणीव.
जालना : शहरातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नदीपात्राच्या रेड-ब्लू लाइन निश्चितीसह अतिक्रमण हटविण्याच्या चर्चेचे गुऱ्हाळ वर्षभर रंगले. परंतु, त्यावर काहीच निर्णय न झाल्याने अतिवृष्टीचे पाणी शहरात शिरले.